Author Topic: बाबांची दुकाने बंद करा  (Read 1326 times)

Offline SANJAY M NIKUMBH

 • Full Member
 • ***
 • Posts: 502
बाबांची दुकाने बंद करा
« on: September 09, 2013, 07:39:57 PM »
बाबांची दुकाने बंद करा
===========================
अगोदर त्या आसरामला बापू म्हणणे बंद करा
त्याच्या सर्व शिष्यांनी फाशीची मागणी करा

धर्माच्या नावाखाली तो बुरखा घालून वावरत होता
कृष्णाचा अवतार म्हणवून राक्षस त्याच्या अंगात होता
अंधश्रद्धेचा फायदा घेऊन लोकांना बनवत होता
लोकांना मूर्ख समजून त्यांच्या भावनांशी खेळत होता
त्या हरामखोराला बाबा म्हणणे बंद करा
त्याच्या सर्व शिष्यांनी फाशीची मागणी करा

लोकांना चांगले वागण्याची वाईट वागून दीक्षा देत होता
असहाय्यतेचा फायदा घेऊन जादूटोणा करीत होता
उपचाराच्या नावाखाली स्रियांची अब्रू लुटत होता
जक्ख म्हातारा होऊनही कळ्यांना कुस्करत होता
अशा वासनांध माणसाची ढगात पाठवणी करा
त्याच्या सर्व शिष्यांनी फाशीची मागणी करा

लोकांनी अशा बाबांच्या मागे लागणे आता बंद करा
आपल्या देवाची आराधना आपल्याच घरांत करा
अशा भोंदू बाबांना देव बनवणे बंद करा
सगळ्या बाबांची थाटलेली दुकाने ताबडतोब बंद करा
श्रद्धेच्या नावाखाली फसणार नाही याची सर्वांनी शपथ घ्या
त्याच्या सर्व शिष्यांनी फाशीची मागणी करा

कोण होते हे बाबा याचा थोडा विचार करा
सिद्धी कुणासही प्राप्त होत नाही हे ध्यानात धरा
कुणाचही ऐकून कुणाच्या मागे धावणं बंद करा
आपले दु:ख निवारण्यासाठी आपणच प्रयत्न करा
कोटींची माया जमवली बाबांनी
पण कधी कुठे मदत केली नाही याचा थोडा विचार करा

अगोदर त्या आसरामला बापू म्हणणे बंद करा
त्याच्या सर्व शिष्यांनी फाशीची मागणी करा .
====================================
संजय एम निकुंभ , वसई , दि. ९ . ९ . १३ 


Marathi Kavita : मराठी कविता


Offline rudra

 • Full Member
 • ***
 • Posts: 879
 • Gender: Male
 • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
  • My kavita / charolya
Re: बाबांची दुकाने बंद करा
« Reply #1 on: September 10, 2013, 04:44:11 PM »
nakkich tyala fashila latkava...

Offline krishnakumarpradhan

 • Newbie
 • *
 • Posts: 37
 • Gender: Male
  • krishnakumarpradhan
Re: बाबांची दुकाने बंद करा
« Reply #2 on: September 11, 2013, 07:34:31 AM »
कवितेचा आशय चांगला आहे

Offline SANJAY M NIKUMBH

 • Full Member
 • ***
 • Posts: 502
Re: बाबांची दुकाने बंद करा
« Reply #3 on: October 06, 2013, 10:10:06 PM »
thanx rudra and krushnkumar