काय करावे कळत नव्हते
मागुनही मिळत नव्हते
सरपटणार्या त्या आयुष्याला
हक्काचे असे बिळच नव्हते
काय करावे कळत नव्हते
कुणी आपुले म्हणतच नव्हते
शिवलेल्या त्या कावळ्याला
जिवंतपणि जगणेच नव्हते
काय करावे कळत नव्हते
समोर असून दिसत नव्हते
ती हाक ओठांवर पेलण्याला
शब्द माझे धजत नव्हते
काय करावे कळत नव्हते
रक्त व्यथेतून रुकत नव्हते
ह्रुदयावर फिरलेल्या त्या मोरपीसांचे
अरे घाव काय थोडे होते