Author Topic: काय लिहावे, कसे लिहावे  (Read 923 times)

Offline shailesh.k

  • Newbie
  • *
  • Posts: 8
  • Gender: Male
काय लिहावे, कसे लिहावे
« on: September 12, 2013, 04:11:35 PM »
काय लिहावे, कसे लिहावे
मन पाखरूस शब्द सुचावे
सुंदर, मोहक अर्थ असावे
दृष्टी, सृष्टी हृदयी उरावे

शब्द घुंगरू रुणझुणतांना
अक्षरे सुरांत गुणगुणतांना
जणू कागदी शुभ्र नभावर
ढग निळे मग दाटी भरभर

भाव मनीचे रिमझिम धारा
भिजुनी जाई आसमंत सारा
भेटी धरणीस उनाड वारा
घेऊनी या ओळींच्या गारा

शब्द झरे मग भरुनी वाहे
हर्ष सर्वदूर सांगत जावे
काव्यपुष्प या ओंजळीत यावे
कवी सागरी विलीन व्हावे

काय लिहावे, कसे लिहावे
मन पाखरूस शब्द सुचावे

Marathi Kavita : मराठी कविता