मी लिहितो तेव्हा माझी,
लेखणी बासरी होते
मी जिथे सारखा बसतो
ती अशी ओसरी होते
मी लिहितो तेव्हा सगळ्या
सृष्टीचा कागद होतो
शब्दांच्या वर्षावाला
जो टिपतो, ओला होतो
मी लिहितो तेव्हा लिहिणे,
स्वप्नाहून सुंदर होते
कवितेच्या दवबिंदूंनी
पानांची थरथर होते
मी लिहितो तेव्हा तेव्हा,
मी लिहितो ऐसे काही,
जणू धमन्यांमधे माझ्या
वाहते जांभळी शाई..
मी लिहितो तेव्हा मजला,
जाणवते अपुले अंतर
कवितेच्या थोडे आधी,
कवितेच्या थोडे नंतर....!
लेखणी बासरी होते
मी जिथे सारखा बसतो
ती अशी ओसरी होते
मी लिहितो तेव्हा सगळ्या
सृष्टीचा कागद होतो
शब्दांच्या वर्षावाला
जो टिपतो, ओला होतो
मी लिहितो तेव्हा लिहिणे,
स्वप्नाहून सुंदर होते
कवितेच्या दवबिंदूंनी
पानांची थरथर होते
मी लिहितो तेव्हा तेव्हा,
मी लिहितो ऐसे काही,
जणू धमन्यांमधे माझ्या
वाहते जांभळी शाई..
मी लिहितो तेव्हा मजला,
जाणवते अपुले अंतर
कवितेच्या थोडे आधी,
कवितेच्या थोडे नंतर....!