Author Topic: ---- परीस राणी ----  (Read 562 times)

Offline सूर्य

  • Jr. Member
  • **
  • Posts: 59
  • Gender: Male
---- परीस राणी ----
« on: September 14, 2013, 01:39:04 PM »
तुला व्यथांचा खरा पुरावा कुठून देवू परीस राणी ..!

नवीन कविता नवीन गझला लिहून घेण्या हवीस राणी ..!कुणास पत्ता जुने पुराने असेल काळिज अलीकडे ते ,

 नवीन होणे जमेल सुद्धा  तसा हवा मोरपीस राणी  !..नशीब आहे तुला मिळाला चुकामुकीतच खरा दिवाना,

उरात माझ्या गुलाब काटा मला तशी भेटलीस राणी !..नको मुळी आरश्यात पाहू असेल तेथे तिढा कुणाचा ,

घरात ह्या चेहरा तुझा मी मला तशी फ़क़्त दीस राणी !..अजून वाटे कधी तुला तर मिठीत घेवू  जरा शहारू ,

निघून गेले दिवस अखेरी खरेखुरे यायचीस राणी !..संदीप पाटील ...(सूर्य)

Marathi Kavita : मराठी कविता