मोगर्याच्या वेलीवरचंपहिलंच फूल; जीवाला वेड लाऊन गेलं
संध्येच्या सुंदर प्रकाशाला गोड सुगंध देऊन गेलं.
बहराच्या आनंदी दिवसांचं मोहक चित्र दाऊन गेलं.
सुगंधाची उधळण करीत फूल एकदा सुकून गेलं.
कसली बरं वाट पाहतो आहे मी
स्वतःलाच फसवून जगतो आहे मी
काय करायचय नी काय टाळायचंय
सगळंच तर कळतंय
कुठेतरी आत मात्र काहीतरी जळतंय
विझवायचं सोडून तेल ओततोय मी
कसली बरं वाट पाहतो आहे मी...