Author Topic: माझी मुंबई ...  (Read 803 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,191
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
माझी मुंबई ...
« on: October 10, 2013, 10:42:11 PM »
दुध केंद्रावर बाटल्यांची,
नाक्यावर पेपरवाल्यांची 
शाळेत जाणाऱ्या मुलांची,
पाळीवाल्या कामगारांची
गर्दी असायची तेंव्हा मुंबईत !

मुलांना मास्तरांची,
भुरटयांना पोलिसाची,
उचल्याना दुकानदारांची,
माणसाला देवधर्माची,
भीती असायची तेंव्हा मुंबईत !

दुपार नंतर केंव्हाही,
आंटीच्या अड्ड्यावर पिणाऱ्याची,
चौपाटीवर मालिश वाल्यांची,
रस्त्यावर गंडेरी वाल्यांची,
गर्दी असायची तेंव्हा मुंबईत !

संध्याकाळी चाकरमान्याची,
त्यानंतर उशीरा शौकीनाची,
चौका, वाड्यांमधून खेळांची,
रात्री पोलिसाच्या गस्तीची,
गर्दी असायची तेंव्हा मुंबईत !

सणासुदीला शुभेच्छाची,
दिवाळीला कंदिलांची,
ईदला शीर - कुर्म्याची,
शेजाऱ्याला शेजारर्धार्माची,
जाणिव असायची तेंव्हा मुंबईत !

दगड बनलेल्या ह्रदयांची,
चाकं लागलेल्या पायाची,
पाठीशी उभ्या अतिरेक्याची,
संवेदनशून्य मनोऱ्याची,
सावली असते आता मुंबईत !

नरभक्षक नरांची,
शंकेखोर डोळ्यांची,
आभाळ पाडणाऱ्या सशांची,
गर्दी असते आता मुंबईत !© शिवाजी सांगळे sangle.su@gmail.com  +919422779941

Marathi Kavita : मराठी कविता

माझी मुंबई ...
« on: October 10, 2013, 10:42:11 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,191
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
Re: माझी मुंबई ...
« Reply #1 on: March 15, 2014, 09:06:45 PM »
या कवितेवर एक विडीओ सुद्धा केलेला आहे, तो utube/facebook  "Mhaji Mumbai" या नावाने शोधू शकता,,, धन्यवाद

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दोन अधिक पाच किती ? (answer in English number):