Author Topic: काय काय झाले ...?  (Read 596 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,266
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
काय काय झाले ...?
« on: October 10, 2013, 10:45:27 PM »
थेटरा ऐवजी मौल आले,
म्युन्सिपाल्टी मराठी बदली
इंग्रजी कॉनवेंट आले,
आयला, मायला म्हणणारे
येस, नो, थ्याक़्यु करते झाले!
म्हणूनच कि काय ?
सोडा बॉटल, टयूब, दगडां
जागी एके ४७, बॉंब आले ?
खरच स्वतःला किती...
प्रगती पथावर नेले ?
पुढाऱ्यांनी सर्व मात्र
जनतेला नागवे केले,
अतिरेक्यांनी ...
पोलीसांसह सामान्यांना
देवाघरी पाठवले !
का आपण असे थंड ?
कि षंढ सारे झाले ?

© शिवाजी सांगळे sangle.su@gmail.com  +919422779941

Marathi Kavita : मराठी कविता