Author Topic: शाळा  (Read 1530 times)

Offline dipak chandane

 • Jr. Member
 • **
 • Posts: 68
शाळा
« on: October 11, 2013, 06:25:18 PM »
शाळा म्हणजे जीवनातील अमूल्य असं स्थान
जेंव्हा असतो शाळेत तेंव्हा नसते त्याच भान

किती या शाळेनं भरभरून दिलं हे ज्ञान
बाहेर पडल्यावर कळतं
तिथं नव्हतं सुखाला वाण

शाळेत होतो तेंव्हा किती किती खेळायचो
इकडून तिकडे कसे वेड्यावाणी पळायचो
शेतातल्या त्या गंजीवर उड्या मारत लोळायचो

कधी खो खो, कधी कब्बडी तर कधी चेंडू फळी
मनं कशी होत तिथं आपोआप मोकळी

आठवतं मला अजूनही .......
शाळेत कधी लवकर तर कधी उशिरा जाणं
उशिरा गेल्याने लेटकमर्स म्हणुनी मार खाणं

आठवतात मला अजूनही बोबडे माझे बोलं
कवायतीसाठी वाजे तिथे झांजासाहित ढोल

नव्हत्या कुठल्या सीमारेषा नव्हतं कशाच भान
खेळायलाच असायचं तिथं मोकळं सारं रान

पण.........
कशी आणावी पुन्हा घटना घडलेली ती वेळ ?
कसे आणावे पुन्हा आयुष्यात खेळलेले खेळ ?

मग ..........
अनुभवाया पुन्हा एकदा व्हावं का लहान ?
मागावं का देवाकडे त्या पुन्हा बालपण .......?

                                     -दि.मा.चांदणे

Marathi Kavita : मराठी कविता

शाळा
« on: October 11, 2013, 06:25:18 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

Offline dipak chandane

 • Jr. Member
 • **
 • Posts: 68
Re: शाळा
« Reply #1 on: October 14, 2013, 06:41:50 PM »
आभारी आहे मित्रा ..........तुझ्या मार्गदर्शना बद्दल

Offline शिवाजी सांगळे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,194
 • Gender: Male
 • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
Re: शाळा
« Reply #2 on: December 05, 2013, 03:16:26 PM »
Dipak pl watch vedio "Majhi Mumbai"- a poetic journey of Mumbai, base on my poem, on You tube on http://www.youtube.com/watch?v=LsH_sFmf9f0  and Face Book... created by "Vedh Media" our production, with regards

Offline dipak chandane

 • Jr. Member
 • **
 • Posts: 68
Re: शाळा
« Reply #3 on: April 09, 2014, 03:54:46 PM »
सर मी "माझी मुंबई " पाहिलं आहे खुपचं छान झालीय सर ...........मुंबईच सार चित्रच  आहे  .........

Offline शिवाजी सांगळे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,194
 • Gender: Male
 • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
Re: शाळा
« Reply #4 on: April 10, 2014, 05:16:28 PM »
दीपक, धन्यवाद... बाकी इतर कविता फेस बुक वर आहेत, तसेच मी फेसबुक वर एक पेज सुद्धा सुरु केले आहे,जरूर पहा . पुन्हा एकदा धन्यवाद 

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दोन अधिक पाच किती ? (answer in English number):