Author Topic: चला जाळून टाकू रावणाला  (Read 469 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
चला जाळून टाकू रावणाला
« on: October 13, 2013, 01:55:10 PM »
चला जाळून टाकू रावणाला ………………संजय निकुंभ
====================
चला ! आपणही रावण जाळून टाकू आज
आपल्या मनात पोसलेला
हुडकून काढू त्या जागा
जिथे अहंकार आहे लपलेला

बघा कुठेतरी खोलवर
फक्त स्वार्थ आहे दडलेला
आज त्यासही जाळून टाकू
या विजया दशमीच्या मुहूर्ताला

जाती धर्माची बंधने
झुगारून देऊ आज
शपथ घेऊ चला
मनात जपू फक्त माणुसकीला

माणूस तर एकसारखाच
या विधात्याने निर्मिलेला
आपणच धर्मांच्या भीती बांधून
त्यास एकमेकापासून वेगळा केला

असू द्या प्रत्येकाने मनात
ज्या धर्मात आहे तो जन्मलेला
पण माणसांत वावरतांना त्याने
जपत रहावे नित्य माणूस धर्माला .
========================
संजय एम निकुंभ , वसई
दि. १३ . १० . १३ वेळ : ५ .३० स.

Marathi Kavita : मराठी कविता