Author Topic: स्त्रीभ्रूणहत्या  (Read 840 times)

Offline aap

  • Jr. Member
  • **
  • Posts: 94
स्त्रीभ्रूणहत्या
« on: October 15, 2013, 05:48:55 PM »
स्त्रीभ्रूणहत्या

रात्रीच्या एकांती गर्भातूनी बोलले मी आईशी
का ग आई झाले मी नकोशी

तुझे माझे रक्ताचे नाते बांधले नाळेशी
नको ग असा खेळ मांडू कोवळ्या कळीशी

जन्मा आधि खुडू नको ग मला
स्त्रीजन्माचे सार्थक होईल जन्मा घालून मला

स्त्रीने स्त्रीत्व खुडावे पडे काळजास पीळ
नको घालू ग निसर्ग चक्रास खीळ
सौ . अनिता फणसळकर     

Marathi Kavita : मराठी कविता