Author Topic: कां घडले असे …….  (Read 790 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
कां घडले असे …….
« on: October 15, 2013, 09:47:33 PM »
कां घडले असे …….
=================
जे काय मिळविले होते सारे धुळीस मिळाले
मेळाव्याच्या दिवशी जोशी पायउतार झाले
हि सारी नामुष्की त्यांनी ओढवून घेतली
सत्ता दिसत होती जरी पंच्यात्तरी आली

सत्ता अन पैशासाठी ते लाचार झाले
जे होते नाव कमावले सारे मातीत मिळाले
संधी होती त्यांना मोठे म्हणून मिरवण्याची
काही गरज नव्हती निवडणूक लढण्याच्या इच्छेची

इतके भोगूनही आयुष्यात समाधान कसे आले नाही
काय फायदा जगण्याचा ज्यास जगणे कळले नाही
स्वतःहून दुःखाच्या खाईत त्यांनी उडी मारली
नवीन कुणासही संधी द्यावी हि गरज नाही जाणली

ज्या सेनेने मोठे केले त्यांनीच त्यांना लाथाडले
अशी वेळ का येऊ द्यावी हे कसे नाही ओळखले
ज्यांनी मानाने मिरवायला हवं त्यांना तोंड लपविण्याची पाळी आली
इतर म्हाताऱ्या नेत्यांनीची धडा घ्यावा अशी घटना घडली .
======================================
संजय निकुंभ , वसई

Marathi Kavita : मराठी कविता