Author Topic: आली आली दिवाळी  (Read 707 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
आली आली दिवाळी
« on: October 27, 2013, 06:38:02 AM »
आली आली दिवाळी
=============
कशी साजरी करू
आली आली दिवाळी
जिकडे पहावं तिथे
महागाई पेटली

किंमती गेल्या गगनावरी
फराळाची चव गेली
नवीन कपड्यांची तर
हौस मनात राहिली

फटाके घेण्या अगोदर
खिश्यास आग लागली
कसे आले हे दिन
स्वातंत्र्याची माय मेली

आपल्याच माणसांनी या
देशाची अशी दैना केली
या सणाच्या आनंदाची
त्यांनीच होळी केली

लोकशाही भटके येथे
विवस्र होऊन गल्लोगल्ली
कशी साजरी करू
सांगा मी आता दिवाळी .
===================
संजय एम निकुंभ , वसई
दि. २७ . १० . १३  वेळ : ६.३० संध्या .       

Marathi Kavita : मराठी कविता