Author Topic: कात्रीत सापडलेली कोंबडी अन माणूस  (Read 747 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
कात्रीत सापडलेली कोंबडी अन माणूस
=========================
कोंबडीच्या पिल्लासही वाढवतांना
मधुर संगीत ऐकवलं जातं
तिचं मन अन शरीर यांना
जीवापाड जपलं जातं

दिवसागणिक ते पिल्लू
हळू हळू मोठं होतं
स्वच्छंदपणे इकडे तिकडे
बागडत दाणे टिपत रहातं   

माणूस त्याची कां काळजी घेतो
तेव्हा त्याला कुठे ठाऊक असतं
त्याचं मन तेव्हा दु:खी होतं
जेव्हा त्याला विकलं जातं

पिंजऱ्यातून बाहेर काढतांना
पंखांची फडफड सुरु करतं
घटिका आपली भरतं आली
त्याच्या मनाला कळून चुकतं

जेव्हा पकडली जाते त्याची मान
तेव्हा शेवटची फडफड ते करून घेतं
एकाच फटक्यात मान कापून
डब्यात तडफडायला टाकलं जातं  ……….

माणसाचं आयुष्य तरी
दुसरं कायं असतं
कुणीतरी भेटतो वाटेवर
माणुसकीच नातं जुळून जातं

गोड गोड बोलून
ओळख तो वाढवत जातो
मग मदतीची याचना करून
जाळं तो विणत जातो

कधी माणुसकीनं कधी लालसेनं
माणूस त्यात फसत जातो
त्या कोंबडी सारखीच फडफड होऊन
कात्रीत तो सापडून जातो

माणसापेक्षा ती कोंबडी बरी
तिला एकदाचं संपवलं जातं
माणसाची फडफड चालूच रहाते
त्याचं मन तिळ तिळ तुटत रहातं .
======================
संजय एम निकुंभ , वसई
दि. २८ . १० . १३