Author Topic: अनुभवाचे मोल  (Read 720 times)

Offline aap

  • Jr. Member
  • **
  • Posts: 94
अनुभवाचे मोल
« on: November 06, 2013, 06:15:46 PM »
 अनुभवाचे मोल

अनुभवाचा गुरु
जीवनाचे तारू

कधी होई दगा
कधी बसे फटका

कधी भासे चणचण
कधी होई वणवण

कधी होई प्रतारणा
कधी होई निर्भसना

कधी मिळे  मदतीचा हात
कधी कोणी फिरवी पाठ

अनुभव येई वाईट गोड
अनुभव असे सुखद दु:खद

अनुभवाचे बोल
कळे त्याचे मोल

अनुभवाचे शहाणपण
जगण्याची देती शिकवण

अनुभवाचे ज्ञान
दावी मार्ग अनमोल
                  सौ  अनिता फणसळकर         


Marathi Kavita : मराठी कविता