Author Topic: शुभेच्छा संदेश  (Read 865 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
शुभेच्छा संदेश
« on: November 07, 2013, 07:45:06 AM »
शुभेच्छा संदेश
===============
किती वाट बघत होतो
किती आसुसलेलं होतं मन
तू शुभेच्छा देशील
अन रोम रोम जाईल बहरून

तुझ्या शब्दातला तो गोडवा
भारून टाकेल मला 
ते शब्द मनात घुमत राहतील
जरी बंद झाला फोन

पण संपूर्ण दिवस तळमळत काढल्यावर
तुझा मेसेज मला दिसला
क्षणभर कां होईना
आनंद गगनात गेला

पण ज्यासाठी आतुरलेले कान
ती मजा या मेसेजमध्ये नाही
कारण मेसेजचा आवाज सतत
मनात घुमू शकत नाही

तुला कधीपासून गरज वाटली
मला मेसेज पाठविण्याची
हि सुरवात तर नाही ना
माझ्यापासून दूर जाण्याची

पण तुलाही चांगल ठाऊक आहे
हे कुठल्याही जन्मात शक्य नाही
तुझ्याशिवाय मी जन्म घेईन
अशी वेळ काळाला कधीच जमणार नाही .
===========================
संजय एम निकुंभ , वसई
दि. ७ . ११ .१३ वेळ : ७ . ३० स.     

Marathi Kavita : मराठी कविता