Author Topic: दिसतं तसं नसतं…………………संजय निकुंभ  (Read 883 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
दिसतं तसं नसतं…………………संजय निकुंभ 
======================
कधी कधी सोप्या गोष्टीही
कठीण होऊन जातात
ज्यांना आपलं समजतो
तेही परक्यासारखं वागतात

ज्यांच्याकडून अपेक्षा नसते
ते परके कामास येतात
अन ज्यांच्यावर असतो विश्वास
तेच नकार देतात

पण काहीही झालं तरी
मार्ग मात्र निघतो
तरी काही काही गोष्टी
मनात घरं करून राहतात

आपलेच अनुभव आपल्याला
शहाणे करून जातात
दिसतं तसं नसतं जग
मनास शिकवून जातात .
==================
संजय एम निकुंभ , वसई
दि . ८.११.१३  वेळ : ५ . ३० स. 
https://www.facebook.com/SanjayNikumbhPoems?ref=hl       

Marathi Kavita : मराठी कविता


Offline pujjwala20

  • Newbie
  • *
  • Posts: 45
आपलेच अनुभव आपल्याला शहाणे करून जातात
अतिशय सुंदर ओळ