Author Topic: भविष्य  (Read 842 times)

Offline aap

  • Jr. Member
  • **
  • Posts: 94
भविष्य
« on: November 08, 2013, 04:17:05 PM »
भविष्य

माणसाचं भविष्य नसते हातावरच्या रेषेत
ते तर असते मनगटाच्या बळात

ग्रह नक्षत्रे भविष्य नसतात घडवत
चढ उतार आयुष्यातले त्याला असतात घडवत

दॆवरुपी अश्वावर प्रयत्नरुपी स्वार होत
इच्छित शिखराचा मार्ग आक्रमत

भविष्य घडवायचं असतं
भविष्य घडवायचं असतं
                             सौ अनिता फणसळकर
       

Marathi Kavita : मराठी कविता