Author Topic: कुणास ठाऊक ...?  (Read 820 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,266
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
कुणास ठाऊक ...?
« on: November 09, 2013, 11:37:48 AM »

खळाळणाऱ्या जळास काय ठाऊक?
किनाऱ्यावर कुणी गात आहे !

स्तब्ध किनाऱ्यास काय ठाऊक?
कडेस कोण विसावणार आहे !

प्रवाहिततेचा धर्म, त्यास ठाऊक ?
सोबती कोण, कशास आहे  ?

वाहणाऱ्या झऱ्यास काय ठाऊक ?
वर कुणीतरी हात धूत आहे !

गर्भारलेल्या नभास काय ठाऊक ?
पाऊस कसा बरसणार आहे ?© शिवाजी सांगळे sangle.su@gmail.com  +919422779941

Marathi Kavita : मराठी कविता