Author Topic: सचिन तेंडूलकर खेळत आहे  (Read 698 times)

Offline shailesh.k

  • Newbie
  • *
  • Posts: 8
  • Gender: Male
सचिन तेंडूलकर खेळत आहे
« on: November 14, 2013, 08:59:58 AM »
तू मैदानावर असल्यावर जग जिंकल्याचा भास
आउट झाल्यावर मात्र पूर्ण दिवसच निराश
इंडियाचं काही आता खरं नाही म्हणत tv बंद करणं
पुढची match बघण्या पुन्हा एकाग्र होऊन बसणं

श्वास रोखून बघितलेला तो प्रत्येक फटका
मैदानात चौफेर चालवलेला षटकारांचा धडाका
धूम ठोकणे मैदानावर match जिंकल्या जिंकल्या
घरी आलं तरी चालूच टोलावणं बॉल मोज्यातला

bat तुझ्यासारखी आणायला केलेला बाबांकडे हट्ट
काहीच नाही मिळालं तर चिकटवून स्टिकर MRF चं
तू सांगितलेलं boost secret मनापासून बघणं 
आणि नावडता दुध ग्लास आवडत गटागटा संपवणं

निवृत्तीनंतर मात्र तुझ्या हे सगळं थांबणार
क्रिकेटच्या मंदिरात आमचा देवच नसणार
शोधत राहील नजर बातमी खेळाच्या पानावर
सचिन तेंडूलकर खेळत आहे नाबाद १००

Marathi Kavita : मराठी कविता