Author Topic: खूप चांगला डाव खेळते हे नशीबही .........  (Read 895 times)

खूप  चांगला डाव  खेळते नशिबही
डोळ्यांनाही अंधत्व देत असतं प्रेमही

विश्वासाची  नाती  राहिलीच कुठे
आधार तर  देतात परकेही
पण साऱ्यांत असूनही  नेहमी  एकटाच मी  ........

असाच मी  मोहात अडकून  नात्यांच्या
शोधू लागलो  रेशीमगाठी  आपुलकीच्या

समोरच होते आपलेही माझेच  त्यांना म्हणायचो
पण  निर्णय नेहमीच  होते   चुकीचेच

शोधले  आपले मी   माणसांतही
पण  देहावरही शेवटी  येणार होते फुले  ती मतलबाचीच     ......

खूप चांगला डाव  खेळते हे  नशीबही .........
-
© प्रशांत डी शिंदे
दि.१९/११/२०१३
स.१०.२४ मि
« Last Edit: November 19, 2013, 10:28:43 AM by प्रशांत दादाराव शिंदे »