Author Topic: सचिन..... सचिन..... सचिन  (Read 645 times)

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
सचिन..... सचिन..... सचिन
« on: November 22, 2013, 03:27:36 PM »
 आला सचिन, गेला सचिन
मनामनांत उरला सचिन
मूर्ती लहान, कीर्ती महान
उत्तुंग  परी भासला सचिन
 
आई बाबांचे एकची स्वप्न
तान्हुला आपला व्हावा सचिन
लहान मोठी मुले खेळती
Roll Model बनला सचिन
 
अबाल वृध्द सारेच दिवाणे
Match नव्हे, आवडला सचिन 
 अटीतटिच्या सामन्या मध्ये
शतकां साठी खेळला सचिन   
 
कधी फरारी, बंगला कधी
वादात कधी अडकला सचिन
match fixing, पार्ट्या, लफडी
वादात कधी न आला सचिन
 
aggression ना defence त्याचा
जपून नेहमी खेळला सचिन
भारतीयांच्या मानसिकतेचा
प्रतिक जणू बनला सचिन
 
काय विचारता गोंधळ कसला?
आहो retire झाला सचिन
तिकिटे विकली लाखलाखाला
शेवटचा आज खेळणार सचिन
 
दिसणार ना देव कुणाला
मंदिरात न राहिला सचिन
काढणार तो cricket academy
घडवणार अन पुन्हा सचिन
 
विक्रमांचे पहाड बाधून
आज retire झाला सचिन
खेळाडूंच्या मैदानातील
भारतरत्न पहिला सचिन
 
 
केदार...

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Çhèx Thakare

 • Full Member
 • ***
 • Posts: 517
 • Gender: Male
 • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
  • https://www.cthakare.blogspot.com
Re: सचिन..... सचिन..... सचिन
« Reply #1 on: November 24, 2013, 09:47:50 PM »
always sachin ...

Offline rahul.patil90

 • Newbie
 • *
 • Posts: 22
 • Gender: Male
Re: सचिन..... सचिन..... सचिन
« Reply #2 on: November 25, 2013, 02:06:43 AM »
sachin paryant pochava hi kavita konitari....  ;)
chhan aahe kavita Kedarji