Author Topic: एक संध्याकाळ हिरवाळलेली.....  (Read 654 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,266
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....दरीने पहाटे आळसावलेल्या,
दुलई धुक्याची पांघरलेली !
नाजुक नक्षी दवकणांची,
पाना फुलांवर विखुरलेली !!

नजर स्थिर माथ्याची,
डोहावर अलगद तरंगलेली !
प्रतिबिंबात डोकावतांना,
कातळ कांती तेजाळलेली !!

घेऊन कडेवर कलरव,
झाडेही सारी सुखावलेली !
आर्त आळवणी मीरेची,
शामल सुरांसह व्यापलेली !!

घेऊन उराशी बदकपिले,
नाव एक विसावलेली !
न्हाऊ घातलेली मेघांनी,
एक संध्याकाळ हिरवाळलेली !!