Author Topic: मरण...  (Read 882 times)

Offline शिवाजी सांगळे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,268
 • Gender: Male
 • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
मरण...
« on: November 25, 2013, 10:47:04 PM »
रात्रीच्या कुशीत आसवे पेरून आलो,
गाडलेल्या आठवणी उरी घेऊन आलो !

जळल्या ओठांची राख चिंब झाली,
रंगहीन ओठ पुन्हा घेऊन आलो !

विसरू पहातोय मर्मबंध जुने सारे,
विसरायचे कसे हेच विसरून आलो !

जीर्ण झाली शब्द सुरावट मैफीलीची,
सूर पुन्हा नव्यानं घेऊन आलो !

शिणलोय फार चालवून ह्या पावलांना,
एवढयात मोकळे त्यांना सोडून आलो !

मरतोय रोज जगण्याने एका नव्या,
थांब, एकदाच आता जगून आलो !© शिवाजी सांगळे sangle.su@gmail +91 9422779941
« Last Edit: November 25, 2013, 10:48:28 PM by शिवाजी सांगळे »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline santoshi.world

 • Moderator
 • Sr. Member
 • *****
 • Posts: 1,372
 • Gender: Female
 • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
  • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
Re: मरण...
« Reply #1 on: November 26, 2013, 12:46:57 PM »
nice ..... hi kavita prem kavita madhun etar kavita section madhye move keli ahe yachi krupaya nondh ghyavi ...

Offline शिवाजी सांगळे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,268
 • Gender: Male
 • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
Re: मरण...
« Reply #2 on: November 26, 2013, 02:32:27 PM »
Thanks Santoshi...
« Last Edit: November 26, 2013, 02:33:16 PM by शिवाजी सांगळे »