Author Topic: सत्तेची हावं  (Read 515 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
सत्तेची हावं
« on: November 30, 2013, 10:51:01 PM »
सत्तेची हावं
-------------------------
अजूनही हावं गेली नाही
म्हणून माफीनामा दिला
आस आहे अजुनी मनी
मिळावे तिकीट लोकसभेला

काय म्हणावे कळे ना
अशा या माणसाला
सत्तेच्या हव्यासापोटी
आग लावली स्वाभिमानाला

खरे तर या वयात
जवळ करावे वैर्याग्याला
राजीनामा देऊन सरळ
जावे रामनाम जपायला

पण इतके सारे मिळवूनही
हावं काही संपत नाही
नको अशी सत्तेची आशा
ज्यात स्वाभिमान काडीमात्र नाही .
=================
संजय एम निकुंभ , वसई

Marathi Kavita : मराठी कविता