Author Topic: कसा तोल ढळतो रे तुझा  (Read 500 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
कसा तोल ढळतो रे तुझा
« on: December 01, 2013, 01:26:11 PM »
कसा तोल ढळतो रे तुझा
===================
काय असतं हो असं "स्री" मध्ये
की इतकं पुरुषाने वहात जायचं
सहवास तिचा कुठेही घडता
आपला तोल ढासळू द्यायचं

कुठे विनयभंग करायचा
तर कुठे तिच्या अब्रूवर हल्ला
अन मग गुन्हा घडल्यावर
तिलाच संपवून टाकायचं

आपल्याही घरात असतेच नां
स्री कुठल्याही नात्याने
मग कां पाहू शकत नाही
समस्त स्री वर्गाकडे थोडे आदराने

विरुद्ध लिंगी असले म्हणून
कां या वासनेत अडकायचं
अन क्षणभंगूर सुखाच्या लालसेने
स्वतःच आयुष्य पणाला लावायचं

कधी शिकशील रे तू माणसा
खऱ्या मर्दासारखं वागायचं
वासनेच्या जाळ्यात अडकून तू
सोडून दे बेइज्जत व्हायचं .
========================
संजय एम निकुंभ , वसई
दि. १ .१२ .१३  वेळ : १ .१० दु.       

Marathi Kavita : मराठी कविता