Author Topic: जीवन यात्रा....  (Read 427 times)

Offline भूषण कासार

  • Jr. Member
  • **
  • Posts: 70
  • Gender: Male
  • जीवन फार सुंदर आहे.....
जीवन यात्रा....
« on: December 02, 2013, 05:24:00 PM »

डोंगर दरी कानाकोप-र्यातुन जीवन आपल वाह्त असत,
सुख: अन दुखा:च्या अलंकारांनी ते सजतही असत,

दुखा:पेक्षा सगळ्यांना सुखा:चीच हाव असते,
ऊन सावलीच्या खेळाकडे आपले लक्षच मूळी नसते,

या जीवनाच्या प्रवाहात अनेक माणसे भेटत जातात,
डोंगराच्या माथ्याशी आल्यावर हात मात्र सोडत जातात,

आपल आपल म्हणत म्हणत डोंगर द-र्याचा शेवट होतो,
जीवनामरणाचा खेळ देखील चुटकी सरशी संपुन जातो,

यालाच तर आपण जीवन म्हणतो......

रचना - भूषण कासार
संपर्क -९५७९५५३६९०
« Last Edit: December 02, 2013, 05:27:26 PM by bhushankasar100@gmail.com »

Marathi Kavita : मराठी कविता