===================================================================================================
आवडत्या माणसाचा फोन येतो
आणि मग..
आजुबजुच सगळ कंटाळवाण जग
अचानक सुंदर वाटायला लागत..
आवडता माणूस साधसच काही बोलतो..
आणि ते आपल्याला आवडणार निघत..
आवडता माणूस जाणून असतो
आपल्या आवडी निवडी......
आपल्याला हवी असते जराशी माया..
आणि त्याच्याचकडून मिळते ती हवी तेवढी......
आवडत्या माणसाने म्हटलेल गाण ..
खूप सुरेल वाटत आणि आवडत्या माणसाच्या नुसत्या आठवणिनेही..
खोल खोल उरात दाटत.......
आयुष्यात कुणाशीतरी जुळावाच
आवडत अस नात..
आवडत्या माणसाला आपणही
आवडण्याने
आयुष्य सुंदर होऊन जात......................
===================================================================================================
===================================================================================================