Author Topic: प्रियासीतून माझी नवरी.....  (Read 734 times)

प्रियासीतून माझी नवरी.....
« on: December 04, 2013, 06:57:37 PM »
आज पुन्हा बरसल्या,
त्या आठवणीच्या सरी,
ज्या नकळत बरसल्या,
अचानक मज वरी.....

अनोळखी वाटेवर,
पटली ओळख खरी,
जाणुन मन केलास,
जादुटोना मज वरी.....

असेही स्वतःहून,
तुझाच जाहलो मी,
झालीस गं शोनू,
तु माझी स्वप्नपरी.....

आलीस जिवाभावाची,
सखी बनुनी माझी,
येशील ना गं शोनू,
लवकरच माझ्या घरी.....

मेँहदीने रंगतील,
गोरेपान हात तुझे,
अंगावर शोभेल दिसेल,
हिरवा शालू भरदारी.....

डोळ्यात साठवील तुझे,
ते निस्सम रुप मी,
जेव्हा होशील तु शोनू,
प्रियासीतून माझी नवरी.....

प्रियासीतून माझी नवरी.....
 :-*   :-*   :-*

_____/)___/ )______./¯”"”/ ’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\) ¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक ०४-१२-२०१३...
दुपारी ०५,५५...
© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता