Author Topic: माझी आई.....  (Read 1063 times)

Offline भूषण कासार

  • Jr. Member
  • **
  • Posts: 70
  • Gender: Male
  • जीवन फार सुंदर आहे.....
माझी आई.....
« on: December 05, 2013, 05:53:20 PM »

आई आज मला तुझी आठवण फार येतेय,
तुझ्या कुशीमधली झोप मला आठवतेय,

माझ्या आजारपणी मीच आता जागतोय,
आधार नाही कुणाचा म्हणुन तुला आठवतोय,

ताटात आज फार खमंग जेवण आहे,
पण तुझ्या हातच्या गोड भाताचा सुगंधच नाहीये,

शाळा सुटल्यावर घरी येतांना आनंदच वेगळा रहायचा,
तुला पाहण्यासाठीच श्वास माझा रोखलेला असायचा,

आई आता वीट आलाय ऑफिसमधल्या जगाचा,
तु येना एकदातरी मला भेटाया.....


रचना - भूषण कासार
संपर्क -९५७९५५३६९०


Marathi Kavita : मराठी कविता