Author Topic: ते म्हणजे बाबा.....  (Read 1185 times)

ते म्हणजे बाबा.....
« on: December 20, 2013, 03:57:28 PM »
आईला तर सर्व आठवतात,
पण ???
ज्यांना आठवावं लागत नाही,
ते म्हणजे बाबा.....

सुखात तर सर्व साथ देतात,
पण ???
दुःखातही जे नेहमी सोबत राहतात,
ते म्हणजे बाबा.....

स्वतःसाठी मेहनत तर सर्व करतात,
पण ???
लेकरांनसाठी जे कबाड कष्ट करतात,
ते म्हणजे बाबा.....

स्वतःसाठी घर तर सर्व घेतात,
पण ???
लेकरांनसाठी घर घेऊन स्वर्ग जे करतात,
ते म्हणजे बाबा.....

स्वतःची हौसमौज तर सर्व करतात,
पण ???
लेकरांनसाठी जे आपलं मन मारतात,
ते म्हणजे बाबा.....

सण वार तर सर्व साजरी करतात,
पण ???
स्वतःची ईच्छा मारुन जे राब राब राबतात,
ते म्हणजे बाबा.....

स्वतःला ठेच लागता सर्व रडतात,
पण ???
लेकरांना ठेच लागल्यावर जे रडतात,
ते म्हणजे बाबा.....

स्वप्ने तर सर्व पाहतात,
पण ???
स्वतःच्या स्वप्नांचा जे त्याग करतात,
ते म्हणजे बाबा.....

I LoVe YoU बाबा...!!
♥ * ♥ * ♥ * ♥ * ♥ * ♥

_____/)___/)______./­­¯”"”/­­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­­\)

स्वलिखित -
दिनांक २०-१२-२०१३...
दुपारी ०२,१९...
© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता