Author Topic: ती आपलीच माणसं असतात.....  (Read 1103 times)

ती आपलीच माणसं असतात.....
« on: December 22, 2013, 10:11:22 PM »
जी आपल्याला दुःख देतात,
ती आपलीच माणसं असतात,
जी भावनेशी खेळतात,
ती आपलीच माणसं असतात.....

जी खोटं नातं जोडतात,
ती आपलीच माणसं असतात,
जी न सांगता सोडून जातात,
ती आपलीच माणसं असतात.....

जी आपल्या बरबादीत हसतात,
ती आपलीच माणसं असतात,
जी ह्रदयाची तुकडे तुकडे करतात,
ती आपलीच माणसं असतात.....

जी आपली असूनही परखी वागतात,
ती आपलीच माणसं असतात,
जी सुख ओरबाडून घेतात,
ती आपलीच माणसं असतात.....

जी स्वतःचा स्वार्थ साधतात,
ती आपलीच माणसं असतात,
जी आपलं असण्याचा आव आणतात,
ती आपलीच माणसं असतात.....

जी जिवंतपणी मरायला लावतात,
ती आपलीच माणसं असतात,
जी दुःखाची खोटी दोन अश्रूं वाहतात,
ती आपलीच माणसं असतात.....

ती आपलीच माणसं असतात.....
 :'(   :'(   :'(   :'(   :'(

_____/)___/)______./­­¯”"”/­­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­­\)

स्वलिखित -
दिनांक २२-१२-२०१३...
सांयकाळी ०६,१९...
© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता