Author Topic: देव बिव असं सार खरच काही नाही  (Read 543 times)

Offline vikrantborse

  • Newbie
  • *
  • Posts: 12
देव बिव असं सार खरच काही नाही,
मानव निर्मित संकल्पना केवळ, यात दुमत नाही.

दुख, संकट, अपयश सार आपण आपलंच ओढवून घेतो
प्रयत्नांती उपाय सोडून उगाच देवा पुढे येतो.
अंधार म्हंटला कि भितो आपण, म्हणतो 'भूत बित तर नाही',
प्रकाशा अभावीची गैरसोय निव्वळ, दुसर काही नाही.
देव बिव असं सार खरच काही नाही.

डोळे असतील तर उघडा जरा,
डोक असेल तर वापर करा.
बाबा-बीबा काही कराल,
तरी मृत्यू आला तर नक्की मराल.
मोक्ष बिक्ष असं काही, जगात कुठेच नाही,
मृतू अटळ सत्य आहे, याला उपाय नाही.
देव बिव असं सार खरच काही नाही.

अरे!!! का उगाच स्वतःला असा त्रास करून घेता?
स्वतःसकट इतरानाही का अज्ञानाकडे नेता?
शक्ती, युक्ती वापरून जरा रोटी, इज्जत मिळावा,
विज्ञानाचा हात धरून अंधश्रद्धेला पळवा.
लक्षात घ्या! कर्माशिवाय फळ मिळत नाही,
अन, देव-दानव वा सुकर्म-अकर्म यात मुळीच अंतर नाही.
(देव=सुकर्म, दानव=अकर्म)
पुन्हा, सांगतो मित्र हो!!
देव बिव असं सार खरच काही नाही.
मानव निर्मित संकल्पना केवळ, यात दुमत नाही.
--रत्नप्रवि-