Author Topic: ह्याच्या त्याच्या नावावर बील आम्ही फाडतो  (Read 667 times)

Offline vikrantborse

  • Newbie
  • *
  • Posts: 12
ह्याच्या त्याच्या नावावर बील आम्ही फाडतो

ह्याच्या त्याच्या नावावर बील आम्ही फाडतो,
खरंच वेळ आली की पळ हळूच काढतो.

'हा' नाही, 'तो' नाही, सार मीच करतो,
खाऊन, पिऊन अगदी उपवासही धरतो.

याला बोल, त्याला बोल, मिळेल त्याला नडतो,
अगदीच अंगाशी आल की कोपऱ्यात पाय पडतो.

भिकार्याची लायकी नाही तरी स्वतःस 'राजे' म्हणतो,
शेण पडले ताटात तरी पंचपक्वान्न गणतो.

खरंच.........
मनामध्ये आत किती किती कुढतो,
पण सर्वांन समोर मात्र हसू चेहर्यावर जडतो.

ह्याच्या त्याच्या नावावर बील आम्ही फाडतो,
खरंच वेळ आली की पळ हळूच काढतो.

नाहीतर जगायचं कसं?

--रत्नप्रवि--