Author Topic: कसा आहे मी ???  (Read 820 times)

कसा आहे मी ???
« on: December 27, 2013, 07:12:58 PM »
कसा आहे मी ???

म्हटलं तर रागट,
म्हटलं तर प्रेमळ,
आपल्या माणसांना,
हक्काने बोलणारा.....

म्हटलं तर भडकू,
म्हटलं तर शांत,
प्रत्येक नातं,
प्रमाणिकपणे जपणारा.....

कसा आहे मी ???

म्हटलं तर बिँदास,
म्हटलं तर एकटा,
स्वतःच्या कर्तव्याला,
वेळो वेळी जागणारा.....

म्हटलं तर वेडा,
म्हटलं तर खास,
आई बाबांना,
देव मानणारा.....

कसा आहे मी ???

म्हटलं तर खोडकर,
म्हटलं तर हट्टी,
प्रत्येक मित्राला आणि,
मैत्रिणीँला सतवणारा.....

मी कसा आहे हे बघू नका,
फक्त मी काय आहे हे पहा.....

धन्यवाद...!!  ;) :P

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक २३-११-२०१३...
दुपारी ०१,००...
© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता