Author Topic: अमृत बोला  (Read 644 times)

Offline aap

  • Jr. Member
  • **
  • Posts: 94
अमृत बोला
« on: January 13, 2014, 01:59:34 PM »
अमृत बोला

तीळ गुळ घ्या अमृत बोला
मकर संक्रातीचा सण हो आला

स्नेह तिळाचा गोडी गुळाची
रसाळ वाणी माधुर्याची

आदान प्रदान आत्मीयतेची
वृद्धिंगत होती नाती मॆत्रत्वाची 

तीळ गुळाची सुधा माधुरी
जीवन गाठी महा शिदोरी

सौ . अनिता फणसळकर 

Marathi Kavita : मराठी कविता