Author Topic: आहे एक माझी स्वीट मैत्रीण...  (Read 1299 times)

Offline suchitra shedge

  • Newbie
  • *
  • Posts: 22
आहे एक माझी स्वीट मैत्रीण...

थोडीशी हसरी अन हसवणारी...

थोडी पागल...

थोडी मंद...

पण खूप सुंदर....

कधी शांत राहणारी....

तर कधी बडबड करून सतावणारी....

कधी समजून नासमज बनणारी....

तर कधी काही न बोलताच समजून जाणारी....

माझ्यावर हक्काने चिडचिड करणारी...

अन रडलेच कधी तर आसवं पुसणारी...

आहे चाश्मिष जराशी...

किती चिडवलं तरी न चिडणारी...

बस झाल न ग असं म्हणून वैतागणारी...

खरतर ती असताना खूप छान वाटत...

अन नसली कि खूप बोर होत....

अशीच आहे ती वेडाबाई...

पण खूप जवळची...

खूप खूप प्रेमळ....

- Suचित्रा Sheडगे
 ;D :P :-* ;D