Author Topic: तिसरी घंटा  (Read 782 times)

Offline aap

  • Jr. Member
  • **
  • Posts: 94
तिसरी घंटा
« on: January 22, 2014, 03:50:28 PM »
तिसरी घंटा

मनुष्य जीवन मिळे एकदाच लाख मोलाचं
लाभले त्याला वरदान वाचेचं

झाली तिन्हीसांज भय वाटे संध्या छायेच
आता सोडा राग ,द्वेष घाला पांघरूण मायेचं

विसरून जा सगळ्या कटु भावना
दिवस नवा घेऊन येई नवी कामना

जगा भरभरून द्या भरभरून जगा जीवन आनंदाच
सार्थक होईल आयुष्याच्या शेवटच्या श्वासाच
सौ . अनिता फणसळकर   

Marathi Kavita : मराठी कविता