Author Topic: तू  (Read 949 times)

Offline prasad gawand

 • Newbie
 • *
 • Posts: 17
 • Gender: Male
तू
« on: February 03, 2014, 12:50:27 AM »
तू
 
निखळ प्रेमाच्या लयी सारखी भावणारी तू ,
कमळ पाकळ्या समानअंतरी लावणारी तू ,
तू कधी त्या निरभ्र आकाश्यातल्या सरीसारखी,
तू कधी उमलणाऱ्या लाजाळूच्याच्या पानासारखी,
 
 
पहाटेच्या साखर स्वप्नासारखी  तू ,
कथेतल्या  नाजूक परीसारखी तू,
तू बरसणाऱ्या रिमझिम श्रावण धारांसारखी  ,
तू मंजुळ कोकिळेच्या स्वरांसारखी .
 
 
चंद्राच्या शीतल चांदण्यासारखी तू ,
मनातल्या कोरीव ताज महालासारखी  तू ,
तू हृदयातल्या हळुवार स्पंदनासारखी
तू निरागस ओठातल्या हस्यासारखी
 
 
 
कवितेतल्या निर्मळ शब्दासारखी तू ,
विरणाऱ्या मृगजळासारखी तू,
तू लेखणीतून उमटलेल्या प्रतीमेसारखी
तू आहेस अगदी वेगळी फक्त तुझ्यासारखी
फक्त तुझ्यासारखी .....
 
                       प्रसाद गावंड
« Last Edit: February 03, 2014, 12:52:17 AM by prasad gawand »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline vijaya kelkar

 • Jr. Member
 • **
 • Posts: 314
Re: तू
« Reply #1 on: February 03, 2014, 02:40:49 PM »
छान .....
    ..............शेवटी गमले तिच्या सारखी तीच

Offline prasad gawand

 • Newbie
 • *
 • Posts: 17
 • Gender: Male
Re: तू
« Reply #2 on: February 03, 2014, 05:56:45 PM »
thank you Vijaya :) thanks for appriciation :) :)