Author Topic: ||केव्हा ...||  (Read 705 times)

Offline Çhèx Thakare

  • Full Member
  • ***
  • Posts: 517
  • Gender: Male
  • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
    • https://www.cthakare.blogspot.com
||केव्हा ...||
« on: February 04, 2014, 09:12:18 PM »
केव्हा ...
.

माझेच मला, काही कळले न कधी तेव्हा
सोडून श्वास माझा, धावून जेव्हा गेला
.
.
झाकून माझी, ती पापणी कोवळी
स्वप्न अंधार रातीतले, पाहून जेव्हा गेला
.
.
दोष काय माझ्या, सावली चा आज होता
जो बेभान वारा, छेडून जेव्हा गेला
.
.
माझेच मला, कळले न कधी तेव्हा
स्वप्न कोवळ्या ऊन्हाचे, मोडून जेव्हा गेला
.
.
तोडून ती पाकळी सुगंधी फुलातली
तो ञाण त्या फुलाचा काढून जेव्हा गेला
.
.
माझेच मला, काही कळले न कधी तेव्हा
सोडून श्वास माझा, धावून जेव्हा गेला
.
.
©  Çhex Thakare

Marathi Kavita : मराठी कविता