Author Topic: संसार  (Read 748 times)

Offline sunitav

  • Newbie
  • *
  • Posts: 30
संसार
« on: February 05, 2014, 07:38:31 PM »
संसार असावा असा...
प्रेमळ आई,वडील कर्तबगारी
भाऊ असावा लक्ष्मणासारखा .

संसार असावा असा ...
असावे मोठे घर
सेवेसाठी नौकर चाकर .

संसार असावा असा ...
सुगरण बायको ,मुले हुशार
फिरायला कार,आणि गलेलठ्ठ पगार.

संसार असावा असा ...
नजरेत भरण्यासारखा
संसार असावा असा ...
दृष्ट लागण्यासारखा .

संसार असावा असा ...
विश्वासावर चालणारा
संसार असावा असा...
एकमेकांना समजून वचन पाळणारा.

सुनिता .

Marathi Kavita : मराठी कविता