Author Topic: विचार  (Read 745 times)

Offline sunitav

  • Newbie
  • *
  • Posts: 30
विचार
« on: February 09, 2014, 06:22:53 PM »
विचारच छळतात जीवाला
विचारच जाळतात मनाला

विचाराने आयुष्य घडत
अविचाराने बिघडत

विचारच मने जोडी
अविचार नाते तोडी

विचार आहे कारक
अविचार आहे मारक

विचाराने वाढते बुद्धी
अविचाराने कुंठते मति

विचाराचा सगळा खेळ
विचारानेच बसतो मेळ

विचाराचा विचार करा
जीवनात आपल्या सुधार करा
   
                      .......सुनिता .
« Last Edit: February 09, 2014, 06:27:36 PM by sunitav »

Marathi Kavita : मराठी कविता