Author Topic: तिची व्यथा  (Read 669 times)

Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
तिची व्यथा
« on: February 21, 2014, 12:48:09 PM »
हि थंडी बघ ना! अजूनही संपत नाही
 
ही थंड पाघरुणे, बंद खिडकीची काचं...
डोळ्यात झोप, अंगातही ग्लानी फांर...
तोंडावर सपके, मारूनी थंड पाण्याचे...
मी कळा सोसते दुखणार्या दातांत. 
....................................................या थंड सकाळी मजला उठवत नाही...
....................................................हि थंडी बघ ना! अजूनही संपत नाही. 
 
उठताच ओढते, जाड शालीची झुलं,
येतेच जणू मी, बर्फातूनं चालंत,
कडकडा वाजती दाता वरती दातं. 
तू तयार असतो, चहा गरम घेऊन,
....................................................वाटते हसावे गोडं...पण जमतच नाही...
....................................................हि थंडी बघ ना! अजूनही संपत नाही. 
 
ओट्यावर असते, भांड्यांची ती रासं,
कापते हातास रे, थंड पाण्याची धारं,
ते डबे रोजचे...  नाष्टे..., उष्टे अन कामं,
चुकतील कधी का? जरी न केली आजं!
....................................................या भद्द सकाळी, छळ हा सोसत नाही...
....................................................हि थंडी बघ ना! अजूनही संपत नाही. 
 
भर दुपार तरीही शांत असेe अंबर,
आवाज कुठे ना...... ना पंख्याची घरघरं,
गादीवर थंड मी, कुडकुड करते फारं,
अन शिव्या घालते, स्मशानशांत दिशांस,
....................................................शांतता अशी ही मजला आवडत नाही...
....................................................हि थंडी बघ ना! अजूनही संपत नाही. 
 
घालून स्वेटर, काम करावे कसले!
पसरून पाय ना, जराही बसणे जमते. 
ना कपडे नवे, कोणास दावणे जमते.
लोकांस आवडे तरी कशी गं बाई?
....................................................ती मजला बाई जरा ही सहवत नाही...
....................................................हि थंडी बघ ना! अजूनही संपत नाही. 
 
रातीस नहाते गरम पाण्यानी छान.
मी मनात रचते भलते भलते छान.
पडते गादीवर... मुटकुळे करून छान.
येउन जवळ तू मिठी मारतो छान. ...
....................................................पण करू काय??? मुटकुळे सुटतच नाही...
....................................................हि थंडी बघ ना! अजूनही संपत नाही.
 
हि थंडी बघ ना! अजूनही संपत नाही. 
 
केदार...
 
असो........  दोन दिवस झाले. थंडी अचानक कमी झालीय बरं का!
 
Marathi Kavita : मराठी कविता