Author Topic: आम्हाला काय त्याच ?  (Read 626 times)

Offline Pravin Raghunath Kale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 115
  • Gender: Male
  • लेखणीतून या आज श्रावण धारा बरसल्या..
आम्हाला काय त्याच ?
« on: March 13, 2014, 03:48:30 PM »
पडूद्या गारा
किंवा पडुद्या दुष्काळ
बनुद्या शेतजमीन
ओसाड माळ
आम्हाला काय त्याच ?
आमचा फक्त  सत्ता  खेळ
आमचा नाही चालत
खेळ   जास्त काळ
फक्त निवडणूकीची
एक च वेळ
बाकी इतर वेळ
आम्हाला काय त्याच ?
आमचा फक्त सत्ता खेळ

येता निवडणूका करू मदत
ही तर आमची नेहमीची आदत
देवू पैशाची पाकिटे
सोबतीला जातीपातीची समीकरणे
आश्वासनाची वरात, मतदाराच्या दारात
निवडणूकीच्या काळात
आम्ही एकदम जोरात
बाकी इतर वेळी
आम्हाला काय त्याच?
आमचा फक्त सत्ता खेळ

होता निवडणूक
प्रत्येएकजण आपल्याच गुत्त्यांत
आम आदमीची लागुद्या वाट
पाहून घेवू येता योग्य वेळ
बाकी इतर काळ
आम्हाला काय त्याच ?
आमचा फक्त सत्ता खेळ.Pravin Raghunath Kale
8308793007
« Last Edit: August 05, 2014, 03:09:58 PM by प्रविण काळे »

Marathi Kavita : मराठी कविता