Author Topic: आहेत अजूनहि माणसं इथं ....  (Read 884 times)

Offline dipak chandane

  • Jr. Member
  • **
  • Posts: 68
आहेत अजूनहि माणसं इथं .....
मनाला मन भिडवणारी
एकमेकांच्या विचारातून एकमेकांना घडवणारी

आहेत अजूनहि माणसं इथं .....
दिलासा देणारी,समजून घेणारी,
निस्वार्थी भावनेने आपुलकीचे दोन शब्द
प्रेमाने बोलण्याची आपेक्षा करणारी .....

आहेत अजूनहि माणसं इथं....
असह्याला मदत करणारी, बुडत्याला हात देणारी,
वृद्धांना रस्त्यावरून पलीकडे नेणारी,
सतकर्म करून फक्त आशीर्वाद घेणारी...............

आहेत अजूनहि माणसं इथं ....
प्रेमाने बोलणारी, माणसणांना श्रीमंतीत न तोलणारी,
माणसातली माणुसकी मनाला भावणारी,
माणुसकीच्या धाग्यात माणसांना गोवाणारी

आहेत अजूनहि माणसं इथं ....
जीवाला जीव देणारी,
त्या बदल्यात काही न मागणारी,
इमानाने वागणारी

आहेत अजूनहि माणसं इथं ....
हातात हात देणारी,
आपल्या सोबत नेणारी,
प्रेमाच्या नगरीत भरारी घेणारी

या माणसांची हीच जीवन जगण्याची खुबी
म्हणून हि दुनिया अजूनदेखील आहे उभी

मोठेपणा मिरवणारे अनेक माणसं दिसतील
देव देखील ध्यान करेल त्याच्या समोर हीच माणसं असतील
                                                           -   दि.मा.चांदणे
« Last Edit: March 17, 2014, 01:53:09 PM by dipak chandane »