Author Topic: आठवणीतली तू  (Read 992 times)

Offline prasad gawand

  • Newbie
  • *
  • Posts: 17
  • Gender: Male
आठवणीतली तू
« on: March 19, 2014, 01:11:41 AM »
आठवणीतली तू


काय सांगू
तुझी आठवण म्हणजे काय ?
तुझी आठवण म्हणजे तू
तू म्हणजे माझा श्वास .
तुझी  आठवण म्हणजे मी
मी म्हणजे तुला झालेला भास .

काय सांगू
तुझी आठवण म्हणजे काय ?
तुझी आठवण म्हणजे स्वप्नांत आलेली परी
जसं पावसात पडलेल्या ग्रीष्मातल्या सरी.
तुझी  आठवण म्हणजे विरणारे मृगजळ
असं वाटत ते केव्हा येईल का माझ्याजवळ…

काय सांगू
तुझी  आठवण म्हणजे काय ?
तुझी  आठवण म्हणजे माझी पडलेली सावली
जणू वाटत तूच आहेस का ती बाहुली
तुझी आठवण म्हणजे शेवटचा श्वास
जणू तुला बघून जगण्याची लागलेली आसं. :)

प्रसाद गावंड
« Last Edit: March 19, 2014, 01:12:21 AM by prasad gawand »

Marathi Kavita : मराठी कविता