Author Topic: खरं प्रेम म्हणजे काय असतं ???  (Read 1322 times)

खरं प्रेम म्हणजे काय असतं ???

काही जण सांगतात,
खरं प्रेम मनात राहतं.....

काही जण म्हणतात,
खरं प्रेम असं होतं.....

काही जण बोलतात,
खरं प्रेम असं असतं.....

काही जण सांगतात,
खरं प्रेम फसवणूक करतं.....

काही जण बोँबलतात,
खरं प्रेम खोटं असतं....

काही जण समजतात,
खरं प्रेम करणं सोप्प नसतं.....

काही जण सुचवतात,
खरं प्रेम आठवणीत उरतं.....

काही जण समजवतात,
खरं प्रेम करायचं नसतं.....

काही जण ओरडतात,
खरं प्रेम फक्त टाईमपास असतं.....

खरचं कोणी सांगेल का मला,
खरं प्रेम म्हणजे काय असतं ??? :-O

_____/)___/)______./­¯”"”/­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­\)

स्वलिखित -
दिनांक २३-०३-२०१४...
सांयकाळी ०६,०७...
©सुरेश सोनावणे.....