Author Topic: चोरटा  (Read 566 times)

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
चोरटा
« on: April 02, 2014, 10:37:07 AM »
वृत्त : मंजूघोष (माझ्या माहिती प्रमाणे)
लगावली :  गालगागा / गालगागा / गालगागा
मात्रा : ७+७+७ = २१

चोरटा

जाहला बघ चोरटाही थोर आता!
कोण बोले त्या कवीला चोर आता?

टाकता गझला इथे चोरेल कोणी
लागला भलता जिवाला घोर आता

मालकांनी घाम येथे गाळला अन 
हाय फुकटे कुरण चरते ढोर आता

वृत्त मात्रा व्यर्थ रे तू घोकले हे
वाचतो गझला इथे तर पोर आता

सांडणे वाचून यांचे वाटते की
नाचते मोरासवे लांडोर आता
 
पिंजरा हा भरजरी बघ ठेवला पण
त्यात आहे चोरलेला मोर आता

भेटला दोस्तामधे जर चोर कोणी
कास तू त्याच्या गळ्याला दोर आता

काय यांचे वाकडे करणार कोणी
जाहला बघ चोरटा शिरजोर आता
 
चोरुदे ‘’केदार’’ त्याना शब्द सारे
तू प्रतीभेला मनांवर कोर आता
 
केदार...
 
माझे कवीमित्र श्री. अरविंद पोहरकर यांच्या ''मोर लांडोर'' या कवितेवरून आणि त्यांच्याच एका शेरातला रदीफ आणि काफिया चोरून ''कविता चोरांवर'' लिहिलेली हि गझल(?) कविता(?)…कय म्हणायचं ते म्हणा…

 
« Last Edit: April 02, 2014, 12:04:10 PM by केदार मेहेंदळे »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: चोरटा
« Reply #1 on: April 03, 2014, 10:08:56 AM »
mastach...... :)

Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
Re: चोरटा
« Reply #2 on: April 11, 2014, 09:09:26 PM »
chhannnnnnnnn!!!!