Author Topic: तू सीताच रहावीस  (Read 777 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
तू सीताच रहावीस
« on: April 08, 2014, 10:57:09 AM »
तू सीताच रहावीस ………………… संजय एम निकुंभ 
===============
मी नाही होऊ शकत राम
तू मात्र सीताच रहावीस
मी उनाडतो गावभर
तू मात्र वाटच पहावीस

मी उडेन मोकळ्या आभाळात
तू बंदिस्तच रहावीस
मी जरी झालो भ्रमर
तू अबोल पाकळीच रहावीस

मी उनाड वाऱ्यासारखा
हवा तेथे जाईल कुठेही
तुझ्या पावलात घराची बेडी
तू घालून ठेवावीस

मी नर तू नारी
फक्त माझी पूजा करावीस
तुझ्या आयुष्याची वहाण करून
माझ्या पायात घालून जगावीस

कितीही उकिरडे फुंकले तरी
मी रामच राहिन तुझ्यासाठी
तू मात्र सीताच राहून
चारित्र्याच्या उंबरठ्या आडच रहावीस
========================
संजय एम् निकुंभ , वसई दि.८.४.१४ वेळ : ९.३० स.
ए -२०४ , सागर पार्क को -ओप हौ . सो . सागरशेत
पेट्रोल पंप समोर , वसई {प . } ता . वसई जि .  ठाणे
पिन : ४०१२०७  mobile : ९८६०७२६५६०   Marathi Kavita : मराठी कविता


Offline vijaya kelkar

  • Jr. Member
  • **
  • Posts: 314
Re: तू सीताच रहावीस
« Reply #1 on: April 12, 2014, 02:42:41 PM »
मार्मिक ,खरी कविता अन भावना ,
''सीता झाली गीता नि उंचावल्या कक्षा
  तरी ही न चुकेल सत्व परीक्षा ''