Author Topic: एक मत देताना..  (Read 729 times)

Offline Pravin Raghunath Kale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 115
  • Gender: Male
  • लेखणीतून या आज श्रावण धारा बरसल्या..
एक मत देताना..
« on: April 09, 2014, 07:31:35 PM »
प्रथम सर्वाना नम्र विनंती
प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजावावा!!!

मत माझं
मोलाच कि तोलाच
ते देतानाच कळतं
याला कि त्याला
डाव्याला कि उजव्याला
शेवटी मतच ना ते..

नाही दिल तर काय होईल
असं कस , काल त्याने
पैसे दिले होते ना!!
मग मत त्यालाच दिले पाहीजे
नाही नाही तो आपल्या जातीचा
आपलं मत त्यालाच द्या
कोणीतरी सांगितले असते
शेवटी मतचं ना ते...

विसरलो वाटतो आम्ही
दान फूकट द्यायच असतो
कारण मत सुद्धा दानच ना!
तरीही पैसे का घ्यावे
शेवटी मतचं ना ते...

मतदान फक्त हक्क नाही
अधिकार तो आपला
का बजावावा आपण
हेही विसरलो आपण
का कशामुळे

शेवटी मतचं ना ते..
शेवटी मतचं ना ते..


Pravin Raghunath Kale
8308793007
« Last Edit: August 05, 2014, 03:03:31 PM by प्रविण काळे »

Marathi Kavita : मराठी कविता